Wednesday, May 12, 2010

हे स्वप्नांचं आकाश, सोडू नको आज...
हे रंगवता रंगवता वर्षे उलटली
प्रत्येक वेळेस माझी काया पालटली

नको सोडूस कधी स्वप्नांची साथ
नको उधळूस तुझी स्वप्नांची रात्रं
थोडी थोडीच होशील तू मोठी
थोड्याची साथ सोडू नको कधी

जगताना होते श्वासाची कोंडी
हळूच मोडावी कधी त्याची हि मांडी
मग, मग कुठे तरी मिळेल तुला मोकळं वारं
तो क्षण देईल तुझ्या स्वप्नांना धार...